

कल्याणमध्ये रंगला ‘खेळ मांडियेला’
भरघोस बक्षिसांची लयलूट
कल्याण, ता. १० : सकाळ वृत्तपत्र, स्फूर्ती फाउंडेशन आणि शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामनवमीनिमित्त आयोजित ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. सध्या डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे वाचनाची आवड कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून तरुणांमध्ये वाचनाची सवय रुजवणे, माहितीपूर्ण चर्चा घडवणे व समाजाशी जोडणारा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या उपक्रमाची आखणी केली होती.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मंडळ, बचत गटाच्या महिला अध्यक्षा सुनीता कांबळे तसेच परिसरातील महिला मंडळांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंग भरले. पारंपरिक खेळ, संवाद, प्रश्नमंजूषामुळे सहभागी महिलांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला. ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर आणि प्रतीक्षा शिरवाडकर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करीत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र बाजारपेठ यांनी गिफ्ट पार्टनर म्हणून सहकार्य करीत विजेत्यांना सुंदर भेटवस्तू दिल्या. सायली मिलिंद पाटील यांनी ‘खेल मांडियेला’मध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदवत पैठणीचा बहुमान पटकावला. तर अनेक लहान मुलांनी आणि महिलांनी इतर बक्षिसे पटकावली.
स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग तांगडकर, दिलीप सिंग, ॲड. भरत पाटील, अर्जुन बिराजदार, ॲड. योगेंद्र शिरवाडकर, शारदा तांगडकर, प्रतीक्षा शिरवाडकर, कविता देवरूखकर, सायली पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम आपल्या सोसायटीत आयोजित करायचा असल्यास अधिक माहितीसाठी कोमल झेंडे यांना ८०९७६०८०९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.