एकाच दिवशी डझनभर गुन्हे

एकाच दिवशी डझनभर गुन्हे
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः रस्ते आणि फुटपाथ अडवून हातगाडी लावणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र ठाणे पोलिसांनी सुरू केले आहे. याअंतर्गत एकाच दिवशी विविध पोलिस ठाण्यांमध्ये डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे शहरासह जिल्ह्यात फेरीवाल्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा फेरीवाल्यांवर पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करते; पण आता पोलिस प्रशासनानेदेखील रस्ते वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालयात एकाच दिवशी डझनभर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये वर्तकनगर येथील भीमनगर परिसरात, उन्नती इमारतीच्या समोर शिवाईनगर येथे, कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला विक्रेत्यांवर, वागळे इस्टेट पोलिस ठाण्यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलजवळ पाणीपुरी विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर खडकपाडा, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मुंब्रा परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com