सीएसएमटी -आदिलाबाद दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा

सीएसएमटी -आदिलाबाद दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा
Published on

सीएसएमटी-आदिलाबाददरम्यान उन्हाळी विशेष सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आतापर्यंत १,२२८ उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित गाड्या आणि ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त २४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०११ विशेष गाडी आजपासून म्हणजेच १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०१२ विशेष गाडी १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत गुरुवारी आदिलाबाद येथून संध्याकाळी ६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, बोधादी बुजुर्ग आणि किनवट येथे थांबे देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com