

कल्याणमध्ये ‘बिंदास म्हात्रे’ गजाआड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा ‘बिंदास म्हात्रे’ (वय ३६) याला कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ युनिट पथकाने अटक केली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता एक देशी पिस्तूल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि एक काडतुसाची पुंगळी असा एकूण ६२ हजारांचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ युनिटमधील कार्यरत पोलिस शिपाई मिथुन राठोड यांना कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली चक्कीनाका परिसरात राहणारा एक व्यक्ती विनापरवाना गावठी पिस्तूल आणि काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत पोलिसांनी बिंदास याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि एक रिकाम्या काडतुसाची पुंगळी असा एकूण ६२ हजार रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत केला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीने हे पिस्तूल कुठून आणले व यामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.