महागाईविरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी

महागाईविरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी
Published on

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : राज्यात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी; तसेच वाहिनी गॅसच्या किमतीमध्ये नुकतीच दरवाढ करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. राज्यात याचा महागाईचा भडका उडाला असून, हेच का सर्वसामान्यांचे लाडके सरकार असा डिवचणारे पोस्टर सध्या अंबरनाथमध्ये समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हे पोस्टर ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी व्हायरल केले आहे. मोदींजींचे हेच का ते अच्छे दिन असा सवाल त्यांनी यातून उपस्थित केला.
मुंबई आणि परिसरातील सीएनजी वापरकर्त्यांना आता आणखी खर्चाचा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ बुधवारपासून लागू झाली असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. नवीन दरानुसार, सीएनजीची किंमत प्रतिकिलो १.५० रुपयांनी वाढून आता ७९.५० रुपये प्रतिकिलो झाली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायू (पीएनजी)ची किंमत १ रुपयाने वाढली आहे. तर ४९ रुपये प्रति एससीएम झाली आहे. ही दरवाढ मुंबईसह उपनगरांमध्ये लाखो ग्राहकांवर परिणाम करणारी आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे. यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. हेच का सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, आपले लाडके सरकार असा प्रश्न सजग नागरिकांनी उपस्थित केला आहे. अंबरनाथमध्ये या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com