अडीच लाखांच्या एमडीएमएच्या गोळ्या जप्त

अडीच लाखांच्या एमडीएमएच्या गोळ्या जप्त
Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : सीवूड्स सेक्टर ४२ मधील नेक्सास मॉलजवळ अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी मंगळवारी (ता. ८) रात्री सापळा लावून अटक केली. अभिषेक अरुप चौधरी (३३) असे या तरुणाचे नाव असून, अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या एमडीएमएच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या तरुणाला अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाचा शोध सुरू केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने नेक्सास मॉलजवळ सापळा लावून ही कारवाई केली. या वेळी त्याच्याजवळ दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या नारंगी रंगाच्या एमडीएमए या अमली पदार्थाच्या ११.३२ ग्रॅम वजनाच्या एकूण २४ गोळ्या आढळून आल्या. आरोपी अभिषेक चौधरी याच्या चौकशीत त्याला जेकू नावाच्या आफ्रिकन नागरिकाने एमडीएमएच्या गोळ्या विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जेकू या आफ्रिकन नागरिकाचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com