‘धर्मादायी रुग्णालयांत बेजबाबदारपणा नको’

‘धर्मादायी रुग्णालयांत बेजबाबदारपणा नको’
Published on

‘धर्मादायी रुग्णालयांत बेजबाबदारपणा नको’

मुंबई, ता. ११ : शहरातील काही धर्मादाय रुग्णालयांत उपचाराअभावी गरजू रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन देवदास पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे यासंदर्भात पावले उचलण्याची मागणी केली आहे. संबंधित रुग्णालयांकडून शासन आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही रुग्णालये गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार न करता त्यांना नकार देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पडवळ यांनी पाठवलेल्या पत्रात, अशा रुग्णालयांकडून मोफत उपचारासाठी देण्यात येणाऱ्या जागा प्रत्यक्षात वापरल्या जातात का, याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे म्हटले आहे. तसेच, शासनाच्या आरोग्यसेवा योजनेंतर्गत रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळत आहेत का, याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी आग्रही भूमिका पडवळ यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com