

हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक
पाच वर्षांनंतर उत्तर प्रदेश येथून घेतले ताब्यात
भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून पाच वर्षांपूर्वी भिवंडीत सत्तार मन्सुरी यांची गोळ्या घालून हत्या करणारा गुन्ह्यातील फरार आरोपी साजन ऊर्फ बाबर मुमताज अहमद मन्सुरी याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शांतीनगर परिसरातील गुलजारनगर येथे फुलपूर येथील जमिनीच्या वादातून सत्तार मन्सुरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी तिघाजणांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी साजन ऊर्फ बाबर मुमताज अहमद मन्सुरी हा फरार होता. पोलिसांना फरार आरोपी साजन हा उत्तर प्रदेश राज्यातील फुलपूर, प्रयागराज येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकातील रिझवान सैय्यद, प्रशांत बर्वे, रोशन जाधव यांनी उत्तर प्रदेश येथील स्थानिक पोलिसांच्या एसटीएफ पथकातील पोलिस निरीक्षक अनिलकुमार सिंह व त्यांचे सहकारी अजयसिंह यादव, किसनचंद्र, अजय कुमार यादव, मनोजकुमार यांच्या मदतीने अटक केली. त्याला भिवंडी येथे आणून न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.