पोलिस-रिक्षाचालक वाद चिघळला

पोलिस-रिक्षाचालक वाद चिघळला
Published on

पोलिस-रिक्षाचालक वाद चिघळला
डोंबिवलीत दोन तास रिक्षा बंद

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : डोंबिवली पश्चिम परिसरात वाहतूक पोलिस आणि रिक्षाचालक यांच्यातील वाद चिघळल्याचे पाहायला मिळाले. वारंवार तक्रारी, निवेदने देऊनसुद्धा बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता. ११) पश्चिमेतील रिक्षाचालकांनी स्थानक परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पाठिंबा दिला. रिक्षाचालकांनी या वेळी दोन तास स्थानक परिसरातील रिक्षाही बंद केल्या. डोंबिवली रिक्षाचालक-मालक युनियनने शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा बंदची हाक देत स्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. एसीपींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने रिक्षाचालक संतापले. यामुळे आंदोलनकर्त्यांनी वाहतूक पोलिसांविरोधात जोरदार घोषणा देत स्थानक परिसरात रिक्षा अडवून थांबविण्यात आल्या. यामुळे काही काळ प्रवाशांचे हाल झाले. दरम्‍यान, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पश्चिमेला येत आंदोलनकर्त्यांची यांची समजूत काढत दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. आठवडाभरात बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल, तसेच वाहतूक पोलिसही तैनात करण्यात येतील. शहरातील वाहतूक पोलिस, आरटीओ यांची एक बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन या वेळी साबळे यांनी दिले. यानंतर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले आणि स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com