डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास होलोग्राफीतून उलगडणार

डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास होलोग्राफीतून उलगडणार
Published on

डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास होलोग्राफीतून उलगडणार
कल्याणमध्ये ज्ञान केंद्राचे रविवारी उद्‍घाटन

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे उद्‍घाटन येत्या रविवारी (ता. १३) होणार आहे.
हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी स्थानिकांची मागणी होती. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने विक्रमी वेळेत जागेचे आरक्षण बदलाचा निर्णय झाला. यासाठी पाच कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. या निर्णयानंतर आठ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर १२ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर या स्मारकाचे काम सुरू झाले. १० मार्च २०२४ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
...
दिमाखदार सोहळा
स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र, भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालनाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला उद्‍घाटन होणार आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या आवारातील स्मारकात हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com