म्हाडा कार्यालयात मंगळवारी लोकशाही दिन

म्हाडा कार्यालयात मंगळवारी लोकशाही दिन
Published on

म्हाडा कार्यालयात लोकशाहीदिन
सामान्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडा प्रशासनाचा दहावा लोकशाहीदिन मंगळवारी १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडाचे मुख्यालय असलेल्या गृहनिर्माण भवनात हा कार्यक्रम दुपारी १२ वाजेपासून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्यांकडून आलेल्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेतला जाणार आहे.
म्हाडाकडून जानेवारी २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या कार्यालयात लोकशाहीदिन कार्यक्रमाचे आयोजन करून निर्णय घेतला जात असल्याने सामान्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल रोजी लोकशाहीदिन कार्यक्रम होणार आहे. लोकशाहीदिनांतर्गत नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली निघाली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

कोकण मंडळातर्फे १६ एप्रिल रोजी पहिला जनता दरबार
म्हाडातील लोकशाहीदिनाप्रमाणे म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ स्तरावर पहिल्या जनता दरबाराचे बुधवारी (ता. १६) आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांकडून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनता दरबार घेण्यात येत आहे. कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील गुलजारीलाल नंदा सभागृहात हा जनता दरबार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com