

टॅंकरमालकांचा संप सुरूच
वाटाघाटी फिसकटल्या; तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : विहिरी, बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटींविरोधात गुरुवारपासून (ता. १०) संपावर गेलेले टँकरचालक शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम राहिले आहेत. मुंबई टँकर असोसिएशनची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने टँकरचालकांनी संप सुरूच ठेवला आहे. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (ता. १२) आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती असोसिएशनचे पदाधिकारी राजेश ठाकूर यांनी दिली. दरम्याम ‘उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.
मुंबईतील विहिरी, बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने भूजल पातळी घटते आहे. यावर नियंत्रणासाठी विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक केली आहे. यातील काही जाचक अटींविरोधात १० एप्रिलपासून मुंबईतील सुमारे दोन हजार खासगी टँकरचालक संपावर गेले आहेत. मुंबईतील व्यापारी संकुले, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, इमारत बांधकामे तसेच विविध विकासकामांसाठी खासगी टँकरचालकांकडून रोज ३०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, मात्र दोन दिवसांपासून हा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे साठा करून ठेवण्यात आलेले पाणीही संपत आले आहे. याचा परिणाम विविध विकास प्रकल्प, व्यापारी संकुले आदींवर होणार आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांकडे गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर नियंत्रणासाठी पालिकेने विहिरी मालकांना नोटिसा पाठवून नियमाची अंमलबजावणी करण्यास बंधनकारक केले आहे.
...
तोडगा काढण्याची मागणी
केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम पाळले नाहीत, तर टँकरचालकांना दंडात्मक व तुरुंगवासाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे दोन हजार टँकरचालक संपावर गेले आहेत. विहिरींच्या जवळची २०० चौरस मीटर जागा मोकळी हवी, रस्त्यावर पाणी भरू नये या अटींची मुंबईसारख्या ठिकाणी पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी टँकर असोसिएशनची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.