

येऊरचे आदिवासी पाडे तहानलेले
जनता दरबारात कैफियत; कारवाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः येऊरमधील हॉटेल व बंगल्यावाल्यांकडे मुबलक पाणीपुरवठा होत असताना, ऐन कडक उन्हाळ्यात आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना आठवडाभरापासून पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा एक हंडा मिळविण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत असल्याची कैफियत आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पोहोचली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येऊर परिसरातील आदिवासी पाड्यांवर वर्षानुवर्षे आदिवासी नागरिकांची वस्ती आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असलेल्या या पाड्यांवरील नागरिकांना जीवनासाठी संघर्ष करावा लागत आहे. ठाणे महापालिकेकडून पाड्यांपर्यंत पाइपलाइन टाकली असली, तरी येऊरमधील बेकायदा हॉटेल व बंगलेधारकांकडून अनेक ठिकाणी टॅप करून पाणीचोरी केली जाते. त्यामुळे आदिवासी पाड्यांपर्यंत अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाईत वाढ झाल्यामुळे अनेक नागरिकांनी भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. टँकरद्वारेही पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. या प्रश्नाची दखल घेऊन ओमकार चव्हाण यांच्या पुढाकारातून आदिवासी नागरिकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात येऊन निवेदन दिले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी स्वप्नाली साळवी, अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षा नताशा सोनकर यांचीही उपस्थिती होती. ठाण्यात कचराप्रश्न उग्र होत चालला आहे; मात्र यावर राजकारण सुरू होईल, असे उत्तर देत वनमंत्री गणेश नाईक यांनी दोन हात लांब राहणे पसंत केले.
...
उपाययोजना करण्याचे आदेश
येऊरमध्ये स्थानिक आदिवासी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात येऊन व्यथा मांडली. विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून वनमंत्री गणेश नाईक यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.