डॉक्टरांनी वाचवले माता-बालकाचे प्राण

डॉक्टरांनी वाचवले माता-बालकाचे प्राण

Published on

डॉक्टरांनी वाचवले माता-बालकाचे प्राण
सीतावली बालसंगोपन केंद्राकडून शस्त्रक्रिया
विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात आता अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. सातीवली येथील माता बालसंगोपन केंद्रातील डॉक्टरांनीही अशीच एक जटील शस्त्रक्रिया यशस्वीपण करून माता आणि नवजात बालकाला जीवदान दिले आहे.
पालकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ३५ वर्षे वयाची पाचव्या खेपेची माता रात्रीच्यावेळी पोटात दुखत असतानाच माता बाल संगोपन केंद्रा दाखल झाली. सदर रुग्णमातेची तपासणी करून काही वेळाने बाळाने पोटात शी केल्याचे लक्षात आल्याने त्रास संभवत होता. यावेळी नैसर्गिक प्रसूती करण्याची परिस्थिती नसल्याने तत्काळ शस्त्रक्रिया करून बाळाचेही आणि मातेचीही प्राण वाचवण्यात आले.
माता बाल संगोपन केंद्रामध्ये पाच तास शस्त्रक्रिया करून बाळ व मातेला वाचवण्यात आले. यावेळी लागणारे रक्त विजयी ब्लड बँककडून मोफत उपलब्ध करून देण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपमा राणे यांच्या देखरेखीखाली, स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेघा माने, स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रीराम अय्यर, भूल रोगतज्ञ डॉ. तुषार सावंत व सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पालिकेच्या डॉक्टरांच्या ह्या कामगिरी बद्दल पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या माता बाल संगोपन केंद्रातील डॉक्टरांचे अभिनंदन केले आहि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com