हॉलंडच्या महिलेवर मुंबईत उपचार

हॉलंडच्या महिलेवर मुंबईत उपचार

Published on

हॉलंडच्या महिलेवर मुंबईत उपचार
पार्किन्सन्सवरील आजारामुळे त्रस्‍त; महिलेला वेदनांपासून मुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : पार्किन्सन्ससारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराने ११ वर्षांपासून त्रस्त असलेल्या हॉलंडमधील ६४ वर्षीय ॲनी या वृद्ध महिलेला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार मिळाल्याने तिला व तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हॉलंडमध्ये विविध उपचार करूनही फरक न पडल्याने ॲनी यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली. मुंबईतील ज्येष्ठ डॉक्टर प्रदीप महाजन यांनी ॲनी यांच्यावर सेल-आधारित उपचारपद्धती वापरून यशस्वी उपचार केले. विशेष म्हणजे, या थेरपीत रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातील पेशींचा वापर करून मेंदूतील डोपामाइन तयार करणाऱ्या पेशी पुन्हा सक्रिय करण्यात आल्या.
या उपचारामध्ये स्टेम सेल थेरपीसह एक्सोजोम्स, पेरिफेरल रक्तातून मिळवलेले माइटोकॉन्ड्रिया आणि सूक्ष्म प्रवाह (अकौस्टिक वेव्ह) तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूला रिचार्ज करण्यात आले. परिणामी, ॲनी यांना चालणे, बोलणे आणि दैनंदिन कामे करणे पुन्हा शक्य झाले. डॉ. महाजन यांनी सांगितले, की उपचारांनंतर ॲनीच्या शरीराचे संतुलन सुधारले असून तिला वेदनांपासूनही मुक्ती मिळाली आहे. तिचा आत्मविश्वास वाढला आहे. हा उपचार पार्किन्सन्ससाठी क्रांतिकारी ठरू शकतो, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com