कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राऊंडवर आंदोलन
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १०) पहाटे पाच वाजता कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. तीन तास आंदोलन सुरुच असल्याने आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहून अखेर कचरा वाहतुकीशी संबंधित एजी कंपनीच्या संचालकांनी, व्यवस्थापनाने आंदोलनस्थळी धाव घेतली. कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी न करण्याचे आश्वासन दिले व बैठक घेऊन इतर समस्यांचे निवारण करण्याचे मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
कोणत्याही जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर काढू नये, नाका कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, कचरा वेचक लहान वाहनांवर दोन कर्मचारी ठेवावे, एकटा वाहनचालक काम करणार नाही यासह इतर मागण्यासाठी घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे येथील डम्पिंग ग्राऊंडवर पहाटे पाच वाजताच आंदोलन सुरू केले होते. कामगार नेते रविंद्र सावंतही या आंदोलनात पहाटेपासून सहभागी झाले होते. कर्मचारी कचरा वाहतूक काम करत नसल्याचे पाहून एजी कंपनीचे संचालक व व्यवस्थापक आंदोलनस्थळी आले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

