शिक्षणावरील मॉड्युलरचे होणार सर्वेक्षण

शिक्षणावरील मॉड्युलरचे होणार सर्वेक्षण

Published on

वाशी, ता. १३ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने एप्रिल ते जून २०२५दरम्यान देशभरात शिक्षणाचे व्यापक मॉड्यूलर सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणांसाठी नवी मुंबईतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नॅशनल सॅम्पल सर्व्हे (एनएसएस)ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा दिवस साजरा करण्यात आला.
प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन मुंबईच्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय व सहाय्यक संचालक क्रांती गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एनएसओचे ठाणे येथील सहाय्यक संचालक एच. व्ही. राभडिया यांनी प्रशिक्षण देताना शिक्षण सर्वेक्षणाच्या महत्त्वावर भर दिला, ज्यामुळे प्रामुख्याने कुटुंबाचे शिक्षणावरील खर्चावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाशी संबंधित निर्देशांकांची माहिती घेणार असल्याचे स्पष्ट केले. संकलित डेटाचा उपयोग मंत्रालये/विभागांद्वारे जागतिक निर्देशांकांच्या अहवालासाठीदेखील केला जणार आहे. सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्वसामान्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, धोरण तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठी अंदाज तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com