वक्फ विधेयकाचे भिवंडीत पडसाद

वक्फ विधेयकाचे भिवंडीत पडसाद

Published on

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) ः वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार देशभरात निदर्शने सुरू आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी मस्जिद अक्सा (पत्रावली मस्जिद) तसेच निजामपुरा पटेल मोहल्ला येथील मस्जिदबाहेर मुस्लिमांनी जोरदार निदर्शने केली.
वक्फ दुरुस्ती विधेयकामधून देशभरातील आपल्या जुन्या वक्फ जमिनींचा दर्जा रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे आपल्या मशिदी, खानका, कब्रस्तान, दर्गे सर्व धोक्यात आल्याची भावना मुस्लिमांची झाली आहे. त्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याविरोधात देशभरात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याच अनुषंगाने महाराष्ट्र जमियत उलेमाचे संघटना व्यवस्थापक आणि मस्जिद अक्सा (पत्रावली मस्जिद)चे खतीब मुफ्ती मोहम्मद उझैफा कासमी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप सरकारने संख्याबळाच्या जोरावर आक्षेपांकडे दुर्लक्ष करून आणि दुरुस्तीशिवाय विधेयक पुन्हा मंजूर केले. त्याचे कायद्यात रूपांतरित झाले. या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात १ एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत निषेध आंदोलन केले जाणार आहे. याच अनुषंगाने शहरातील मुस्लिमांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून संताप व्यक्त केला आहे. तसेच विधेयक लवकरात लवकर रद्द करावे, अशी मागणी केली.
--------------------------------------------
सरकारविरोधात रोष
कब्रस्तान, दर्गा, मशिदी आणि जनतेच्या मदतीसाठी दान केले जाते, त्याला वक्फ म्हणतात. सध्याचे सरकार आमच्या वक्फवर जबरदस्तीने कब्जा करू इच्छिते. संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेणाऱ्या सरकारची ही वृत्ती कधीही सहन करू शकत नाही. त्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार आंदोलन चालवू, असे निजामपुरा पटेल मोहल्ला मशिदीचे खतीब मौलाना इम्तियाज अहमद फलाही यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com