वाहतूक नियमांचे तीनतेरा
भिवंडी, ता. १३ (बातमीदार): शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बेकायदा रिक्षाचालक व्यवसाय करत आहेत. अनेकदा वाहतुकीचे नियम मोडताना प्रवाशांकडून मनमानी भाडेदेखील आकारतात. त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना त्याचा त्रास होत असल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस शहरात येऊन कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
शहरातील अधिकृत रिक्षाचालकांनी गिरीश जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर खोत आणि कोनगाव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर यादव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी अशा भिवंडी महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात वाहतुकीसाठी परवानगी नसलेल्या १५ वर्षे पूर्ण झालेल्या स्क्रॅब रिक्षा रोडवर धावत आहेत. अशा रिक्षा जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विनापरवाना, विनाबॅच, विनाफिटनेस दाखला, विमा नसलेल्या रिक्षांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठीचे निवेदन वाहतूक अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच नियमानुसार कारवाई झाली नाही, तर रिक्षाचालक संघटना कोर्टाचा दरवाजा ठोठावतील, असा इशाराही या वेळी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

