खाडीकिनारी आढळला तरुणाचा मृतदेह

खाडीकिनारी आढळला तरुणाचा मृतदेह

Published on

कळवा, ता. १३ (बातमीदार)ः खारेगाव रेतीबंदर खाडीकिनारी गणपती विसर्जन घाटाजवळ ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. रविवारी (ता. १३) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
रेतीबंदर खाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी कळवा पोलिसांना दिली होती. त्याआधारे घटनास्थळी पाहणी करून कळवा पोलिस, अग्निशमन दलाच्या जवान, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com