आंबेघर येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन
वज्रेश्वरी (बातमीदार) : मौजे-आंबेघर (पाटीलपाडा) येथे अनेक वर्षांपासून गावाच्या बाजूला नदी असूनसुद्धा पाणी अडवले जात नव्हते. त्यामुळे बारमाही शेतीसाठी पाणी नसल्याने गावकऱ्यांनी सरकारी यंत्रणांकडे येथे बंधारा बांधण्याची मागणी केली होती. अखेर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाईट्स अंधेरी, इनरव्हील क्लब व ए.पी.एस. सोशल वेल्फेअर अँड युथ एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीला येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइटचे अध्यक्ष सुनील आनंद, रोटरी क्लब बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष अपूर्वजी पटेल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा बिनाजी जरीवाला यांनी बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेतला. या वेळी आमदार हरिश्चंद्र भोये, ज्योती भोये, सुरेखा थेतले यांच्या हस्ते बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

