मुलुंडमध्ये चैत्र जत्रोस्‍त्‍सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंडमध्ये चैत्र जत्रोस्‍त्‍सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

मुलुंडमध्ये चैत्र जत्रोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. १३ (बातमीदार) ः मुलुंड उपनगरात गेल्या चारशे वर्षांपासून चैत्र पौर्णिमा शुक्ल पक्षानिमित्त सती जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्‍यानुसार, शनिवारी (ता. १२) सती जत्रोत्सवाच्या भव्य पालखी मिरवणुकीत मुलुंडकरांनी मोठ्या उत्‍साहात सहभाग घेतला. भाविकांनी नाचत-गाजत पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. मुलुंडच्या ग्रामस्थांची पूजनीय माता सतीदेवी, नर्मदादेवी आणि गावदेवी या तिन्ही देवतांच्या जत्रोत्सवाची पालखी मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मुलुंड पश्चिमेतील जुना मुलुंड राजेंद्र प्रसाद रोड येथील माँ सतीदेवी मंदिरात सकाळपासूनच ग्रामस्थ गर्दी करू लागले. या वेळी धार्मिक पूजा, हवन व यज्ञ करण्यात आले. त्‍यानंतर देवींच्या पालखीची भव्य मिरवणूक गव्हाणपाडा येथे पोहोचली. पारंपरिक वाद्ये व ढोल-ताशांच्या गजरात गावकरी मोठ्या संख्येने नाचत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com