‘संविधानाची मूल्य जपण्याची जबाबदारी युवकांवर’
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार)ः भविष्यात नव्या पिढीने सत्यशोधक पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून मनुवादी व्यवस्थेला छेद दिला पाहिजे. सध्या एकाच विचाराचा पगडा जबरदस्तीने दुसऱ्यावर थोपवला जात आहे. समता, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे संविधानाची मूल्य जपण्याची जबाबदारी युवकांवर असून, त्यांना ताकद देण्याचे काम साहित्यिक, बैद्धिकांनी करावे, असे आवाहन मारुती जोशी काका यांनी केले. ठाण्यातील ओबीसी पॅंथर संघटनेच्या स्थापनेवेळी ते बोलत होते.
फुले, शाहू, आंबेडकर हे ओबीसी पॅंथर संघटनेचे प्रेरणास्रोत आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांनी समाज जागृती व समाज परिवर्तनाचे कार्य केले. ते कार्य ते गेल्यानंतर अपूर्ण आहे. बहुजन समाजामध्ये जोपर्यंत प्रशिक्षित दुरदृष्टीवादी कार्यकर्ता तयार होत नाही, तोपर्यंत हे अपूर्ण काम पूर्ण करता येणार नाही. म्हणून ओबीसी पॅंथर संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी, एससी, एसटीच्या समस्यांना शस्त्र बनवून संविधानाच्या आड येणाऱ्या वृत्तीला ठेचून काढले पाहिजे, असे रोशन पाटील यांनी ओबीसी पॅंथरबाबत बोलताना सांगितले. ठाण्यातील मोह विद्यालयात शनिवारी (ता. १२) ओबीसी पॅंथर संघटनेची स्थापना करण्यात आली. या वेळी प्रमुख वक्त्या साधना भेरे यांनी महात्मा फुले व सावित्रीमाई यांचे संपूर्ण जीवन चरित्र खूप छान सोप्या पद्धतीने मांडले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोकळ यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा नवीन पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

