साई मंदिराचा वर्धापनदिन

साई मंदिराचा वर्धापनदिन

Published on

साई मंदिराचा वर्धापनदिन
जोगेश्‍वरी, ता. १३ (बातमीदार) ः गोरेगाव पूर्वेतील बिंबीसार नगरातील साई सेवा मंडळातर्फे साई मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी ‘युग स्त्रिया’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, झाशीची राणी, आनंदी बाई-गोपाळराव, सावित्रीबाई फुले, किरण बेदी, सिंधूताई सपकाळ, बहिणाबाई चौधरी, लता मंगेशकर अशा विविध भूमिका स्त्रियांनी साकारल्या. पुढच्या पिढीला आपला इतिहास समजावा, यासाठी सादर केलेल्‍या हा आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली. तसेच या मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन केले हाेते. स्‍थानिकांनी रांग लावून दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com