कर्जतवासीयांसाठी सामाजिक संस्थेकडून टँकर उपक्रम
कर्जतवासीयांसाठी सामाजिक संस्थेकडून टँकर उपक्रम
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कर्जत तालुक्यातील डोंगराळ आणि आदिवासी भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या दुर्गम भागातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी डोंगर चढावा लागतो. विशेषतः महिलांवर याचे मोठे ओझे येते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे नेते सुधाकर घारे यांनी गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही ‘सुधाकर घारे फाउंडेशन’च्या माध्यमातून मोफत पाणी टँकर सेवा सुरू केली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील टेपाची वाडी येथे झाला. पहिल्या टँकरचे उद्घाटन मधुकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वाडीतील महिलांनी ‘जनता दरबार’मध्ये पाणीटंचाईची व्यथा मांडताच घारे यांनी तत्काळ टँकर सेवा सुरू केली. दररोज २० टँकर तालुक्यातील विविध वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करत आहेत. मागेल त्याला पाणी, या सामाजिक तत्त्वावर आधारित या उपक्रमात राजकारण बाजूला ठेवून फक्त माणुसकीची भावना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. हजारो महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत होती, मात्र या उपक्रमामुळे आता आदिवासी महिलांची पायपीट वाचणार आहे. पाण्याची टंचाई ही कर्जत तालुक्यासाठी दरवर्षीची नैसर्गिक आपत्ती बनली आहे. जलजीवन योजना असली तरी एप्रिलपासून विहिरींमधील पाणी सुकते आणि अनेक गावांवर टंचाईचे सावट घोंगावत राहते. अशा वेळी सुधाकर घारे यांचा टँकर उपक्रम एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

