थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

भाग्यश्री खांडेकर एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
रोहा, ता. १३ (बातमीदार) ः तालुक्यातील खांब विभागातील चिल्हे येथील भाग्यश्री दिलीप खांडेकर ही नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे एमबीबीएस परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. भाग्यश्रीने डाक्टरची पदवी मिळविल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ. भाग्यश्री दिलीप खांडेकर ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. शिवाय कुटुंबातील व्‍यक्‍ती हे उच्चशिक्षित असल्याने भाग्यश्रीदेखील डॉक्टर व्हावी, अशी त्‍यांची अपेक्षा होती. तिचे आई-वडील हे सौदी अरेबिया येथे परदेशात कामानिमित्ताने राहत असून, तिने प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे ठाणे व मुंबई येथे पूर्ण केले. त्‍यानंतर जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. भाग्यश्रीने वैद्यकीय क्षेत्रात अधिक भरारी घेऊन एमडी डिग्रीचे शिक्षण पूर्ण करावे, अशी इच्छा आई अनिता दिलीप खांडेकर यांनी व्यक्त केली आहे.
................
उदय व्यायाम मंडळाच्या अध्यक्षपदी संदेश शिर्के
रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील नडवली येथील विविध क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या उदय व्यायाम मंडळ नडवलीच्या अध्यक्षपदी संदेश शिर्के यांची तर सचिवपदी देविदास वरखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ता. १० एप्रिल रोजी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक मनोज शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली उदय व्यायाम मंडळ व शिवराय मित्र मंडळ मुंबई-ठाणे या दोन्ही मंडळाची संयुक्‍त सभा पार पडली. या विशेष सभेत त्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी किशोर जाधव, महेंद्र भोसले, नितीन मोहिते, संदीप शिर्के, भालचंद्र भांदुर्गे, समीर जाधव, संतोष वरखले, सिद्धार्थ वाटवे, सुमीत जाधव, अरूण वरखले आदी प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांच्यासह शिवराय मित्र मंडळ ठाणे-मुंबई व उदय व्यायाम मंडळ नडवलीचे अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ४० वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या या मंडळाच्या माध्यमातून नेहमीच नवोपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबविले जात आहेत.
..................
आनंदीबाई कचरे यांचे निधन
रोहा (बातमीदार) ः धानकान्हे गावच्या रहिवासी असणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या आनंदीबाई अर्जुन कचरे यांचे ९३ वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. आनंदीबाई कचरे या अतिशय प्रेमळ व विनम्र स्वभावाच्या होत्या. त्यांनी संपूर्ण आयुष्य मेहनत करून परिवार सांभाळला. मुले तसेच नातवंडांवर नेहमीच सुसंस्कार केले. प्रत्येकाच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी होऊन त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. त्यांच्या पश्चात पती अर्जुन कचरे, मुलगा, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
....................
लक्ष्मीबाई अधिकारी यांचे निधन
माणगाव (वार्ताहर) ः येथील रहिवासी लक्ष्मीबाई अनंत अधिकारी (वय, ८१) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. इंदापूर तळाशेत ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा चिटणीस उदय अधिकारी यांच्या त्‍या मातोश्री होत. उदय अधिकारी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या निधनाची बातमी समजताच इंदापूर विभातून माणगाव, तळा, रोहा तसेच जिल्हा भरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तसेच त्याच्या नातेवाइकांनी इंदापूरमध्ये निवासस्थानाबाहेर अंत्यविधीसाठी एकच गर्दी केली होती. उदय अधिकारी यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी समजताच खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी भ्रमणध्वनीवरून अधिकारी परिवारांचे सांत्वन केले. लक्ष्मीबाई अनंत अधिकारी यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन मुली तसेच सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई अधिकारी यांचा दशक्रिया विधी शुक्रवार १८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र उद्धर पाली येथे होणार असून, उत्तरकार्य विधी सोमवार २१ एप्रिल रोजी इंदापूर येथे निवासस्थानी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com