नागरिकांसाठी पोलिसांचे व्हॉट्सॲप चॅनल

नागरिकांसाठी पोलिसांचे व्हॉट्सॲप चॅनल

Published on

नागरिकांसाठी पोलिसांचे व्हॉट्सॲप चॅनेल

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई़़-विरार पोलिसांनी तंत्रज्ञानाची कास धरीत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले आहे. रविवारी (ता. १३) आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत आयुक्तालयात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात नागरिकांशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. संवादाच्या विविध माध्यमांपैकी एक असलेले व्हॉट्सॲप चॅनल पोलिस आयुक्तालयाने सुरू केले आहे. पारदर्शकता वाढवणे आणि पोलिस-जनता संबंध मजबूत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
व्हॉट्सॲप चॅनेलच्या माध्यमातून पोलिस नागरिकांशी सहजपणे जोडले जावे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयामार्फत नागरिकांसाठी राबविले जाणारे उपक्रम, सुरक्षिततेबाबत व कायदेविषयक तसेच आपत्कालीन परिस्थिती याबाबतचे जागरूकता संदेश आदी उपयुक्त माहिती नागरिकांना जलदगतीने मिळणे सोपे होणार आहे. शिवाय नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना जलद निर्णय घेण्यासदेखील मदत होणार आहे. तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांबद्दल या चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना माहिती होणार आहे, असे आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com