गिरणी कामगरांच्या घराच्या प्रश्‍नावर अांदोलन

गिरणी कामगरांच्या घराच्या प्रश्‍नावर अांदोलन

Published on

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्‍नावर आंदोलन
राष्‍ट्रीय मजदूर संघ आक्रमक; लवकरच तारीख ठरणार
शिवडी, ता. १२ (बातमीदार) : राज्य सरकारच्या अनास्थेमधून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न रखडत चालला असून, कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १०) राष्‍ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक मजदूर मंझीलमध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी घरांच्या प्रश्‍नावर आंदोलनाची घोषणा केली. मंगळवारी (ता. १५) सायंकाळी परेलच्या महात्मा गांधी सभागृहात बोलावलेल्या गिरणी कामगार-वारसांच्या सभेत किंवा त्यानंतर आंदोलनाची निश्चित तारीख जाहीर करण्यात येईल, असेही सचिन अहिर यांनी सभेत सांगितले.
गिरणी कामगार घरांसाठी एकूण १ लाख ७५ हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. गेल्या १५ वर्षांत आतापर्यंत अवघी १८ हजार कामगारांना घरे मिळाली आहेत. उर्वरित एक लाख ५० हजार घरे कामगारांना मिळण्यास किती वर्षे लागतील, असा संतप्त सवाल या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. कोकण परिसरात वास्तव्याला असणाऱ्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कोकणात १७ ते २१ एप्रिलदरम्‍यान सावंतवाडी आणि कणकवली, राजापूर, लांजा, चिपळूण आणि पोलादपूर येथे गिरणी कामगार आणि वारसांच्या सभा आयोजित केल्या आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २८ एप्रिलदरम्‍यान गिरणी कामगार आणि वारसांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com