रस्ते अपघातांवरून भिवंडीत संताप

रस्ते अपघातांवरून भिवंडीत संताप

Published on

भिवंडी, ता. १३ (बातमीदार): भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात अपघात होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना करण्यासाठी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आयुक्त तथा प्रशासकांचे लक्ष वेधण्यासाठी दोन वेळा उपोषण केले, परंतु पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही कारवाई केली नाही. त्यामुळे भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा समाजसेवक जाहिद मुख्तार शेख यांनी दिला आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिका हद्दीतील राजीव गांधी उड्डाणपुलावर दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकतर्फी कार्यवाही करून मृत मुलांवर गुन्हा दाखल केले होते, पण या पुलावर असलेल्या केबलच्या वाहिन्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. या पुलावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नेहमी अंधार असतो. तसेच शहरातील रहदारीच्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळेदेखील उड्डाणपुलावरील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत. याचबरोबर भिवंडी शहरातील वंजारप‌ट्टी नाका ते कल्याण नाकापर्यंत, बागे फिरदोस मस्जिद समोर, गोपाळनगर समोर कल्याण नाका, वाहतूक शाखेच्या बाजूला, लिबर्टी हॉटेल, कमला हॉटेल आणि जुना जकात नाका, साईबाबा मंदिरसमोर खड्डे तातडीने बुजवण्यासाठी समाजसेवक जाहिद शेख यांनी महापालिकेसमोर उपोषणही केले होते. या आंदोलनाला माजी खासदार सुरेश टावरे यांनीदेखील पाठिंबा दिला होता, मात्र तरीदेखील पालिका प्रशासनाने सार्वजनिक हिताकडे दुर्लक्ष करत कारवाई केली नसल्यामुळे १ मे रोजी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी पत्र भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com