पश्चिम रेल्वेवर उधना-दानापूरदरम्यान विशेष गाडी

पश्चिम रेल्वेवर उधना-दानापूरदरम्यान विशेष गाडी

Published on

पश्चिम रेल्वेवर उधना-दानापूरदरम्यान विशेष गाडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उन्हाळाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आणि रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने उधना- दानापूरदरम्यान दोन फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन  क्रमांक  ०९०५३ उधना-दानापूर विशेष गाडी सोमवारी (ता. १४) सकाळी पावणेसात वाजता उधनाहून सुटेल. याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०५४ दानापूर-उधना ही गाडी मंगळवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजून १० मिनिटांनी दानापूरहून सुटेल. ही गाड्यांना दोन्ही दिशांनी चलथान, बारडोली, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com