५० हजार २२७ मुदतबाह्य अभिलेख नस्ती नष्ट
वाशी, ता. १३ (बातमीदार) : क्षेत्रीय कार्यालयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला असून, याअंतर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अभिलेखांच्या निंदणीकरणानंतर आवश्यक नसलेल्या अभिलेख नियमांचे रीतसर पालन करून मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्यात येत आहेत. यामध्ये तब्बल ५० हजार २२७ मुदतबाह्य नस्ती (फाइल्स) नष्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये ब वर्गातील ४६, क १ वर्गातील ३६,८०८, क वर्गातील ४,०६६ आणि ड वर्गातील ९,३०७ नस्तींचा समावेश आहे.
बेलापूर अभिलेख कक्षातील क १ वर्गातील ९,९५५ नस्ती तसेच क वर्गातील २,७४९ नस्ती, ऐरोली अभिलेख कक्षातील ब वर्गातील ४६, क १ वर्गातील २६,८५३ आणि क वर्गातील १,३१७ नस्तींचा समावेश आहे. यासोबतच ९,३०७ ड वर्गातील नस्तीही नष्ट करण्यात येत आहेत. अशाप्रकारे एकूण ५०,२२७ नस्ती नष्ट करण्यात येत आहेत. या नस्तींमध्ये स्थानिक संस्था कर/उपकर विभागाच्या सर्वाधिक २३,०७० नस्तींचा समावेश आहे. तसेच मालमत्ता कर विभागाच्या ६४७ नस्तींचा समावेश करण्यात आहे. कृती आराखड्यात जोमाने केलेली अभिलेखविषयक निंदणीकरण, नष्टीकरण, निर्लेखन व अभिलेख कक्षात जतन या बाबतची प्रक्रिया यापुढील काळात सर्व विभागांनी नियमित सुरू ठेवून त्याकरिता कालावधी निश्चित करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

