वुई फाउंडेशन, महापालिका, डब्ल्यूएचओचा विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी प्रकल्प
वुई फाउंडेशन, महापालिका, डब्ल्यूएचओचा
विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी प्रकल्प
मुंबई, ता. १२ : वुई फाउंडेशन, मुंबई महापालिका, जागतिक आरोग्य संघटना तसेच गिलबारको विडर रुट इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे बीकेसीमधील रामकृष्ण परमहंस मार्ग शाळेत नुकताच विद्यार्थिनींना आरोग्यविषयक तसेच शैक्षणिक कौशल्य यांची माहिती देण्याचा उपक्रम आयोजित केला होता.
भारतनगर परिसरातील पाच महापालिका शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना यापूर्वीच या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. या उपक्रमात आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि शैक्षणिक कौशल्ये मुलांना दिली जातात. अस्वच्छता आणि कुपोषण यामुळे भारतात बालमृत्यूदर जास्त आहे. ते टाळण्यासाठी हा प्रकल्प आहे. यात आता १० हजार मुले, त्यांचे १० हजार पालक आणि ५०० शिक्षक यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पालिकेचे आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील म्हणाले.
या उपक्रमात प्रोजेक्ट सक्षमनुसार बदल घडवणारी १०० बालके तयार केली जातील. हे युवानेते त्यांच्या शाळेत आणि वस्त्यांमध्ये आरोग्य, पोषण, शिक्षण, स्थानिक कला आणि पर्यावरण जागृतीशी संबंधित उपक्रमांचे नेतृत्व करतील, असे वुई फाउंडेशनच्या नबनीता बॅनर्जी म्हणाल्या.
सॅनेटरी पॅडचे वाटप
या उपक्रमात मुलांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली. मुलींना साबणांव्यतिरिक्त मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सॅनेटरी पॅड देण्यात आले. इंग्रजी भाषेचे कौशल्य सुधारण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी आरोग्य, पोषण आणि रोगप्रतिबंध याबाबत विशेष सत्रात मुलांना माहिती दिली. मुलांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी कचऱ्यातून कलाकृती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

