डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

Published on

डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात
तळघराचे ९५ टक्के तर प्रवेश प्रांगणाचे काम ८८ टक्के पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून उभारले जात आहे. तब्बल १२ एकर जागेतील या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्मारकाच्या तळघराचे (बेसमेंट) सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, प्रवेश प्रांगणाचे ८८ टक्के, व्याख्यानगृहाचे ७९ टक्के, ग्रंथालयाचे ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा संदेश जगभरात पोहोचावा, त्यांचे अनमोल कार्य येणाऱ्या पिढ्यांना समजावे, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या जागेवर तब्बल १,०८९ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या स्मारकाच्या मध्यभागी चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतीगृह अशा वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. तसेच त्यावर बाबासाहेबांचा भव्य ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. या स्मारकाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी नुकतीच भेट देत कामाची पाहणी केली. तसेच स्मारकाशी संबंधित सर्व यंत्रणांना कामातील गती वाढवण्याचे निर्देशही मुखर्जी यांनी दिले.
----
कामाची टक्केवारी
- तळघर दुमजली (पार्किंग) : ९५ टक्के पूर्ण
- प्रवेश प्रांगण : ८८.५ टक्के पूर्ण
- व्याख्यानगृह : ७८.७५ टक्के पूर्ण
- ग्रंथालय : ८१ टक्के पूर्ण
- प्रदर्शन व प्रेक्षागृह : ६८ टक्के पूर्ण
- पदपथ इमारत : ५२ टक्क्यांहून अधिक पूर्ण


पुतळ्याचे काम वेगात सुरू
- पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण
- १,३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टील खरेदी पूर्ण
- १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन व उभारणी पूर्ण
- एकूण १०,५१० चौरस मीटरपैकी ३०८ चौरस मीटर कांस्य पॅनेलिंग पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com