वीज दरवाढ माघे घेण्याची मागणी
वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उन्हाच्या तडाख्याचा सामना करीत असताना अदाणी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीमुळे मुंबईकरांना जोरदार झटका बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरवाढ म्हणजे ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदाणींच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. अदाणीने ही वीज दरवाढ कमी करून स्वस्त दरात वीज मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभागाचे मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
अदाणी पॉवरने त्यांचे वीजदर वाढवले असून मुंबईकरांना या वाढीव वीजबिलाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. झोपडपट्टीत राहणारे गरीब, कष्टकरी जनतेसह मध्यमवर्गीय कुटुंबालाही या वीज दरवाढीची झळ बसणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या काळात महागाईने जनतेचे जगणे कठीण करून ठेवले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे आणि खासगीकरणामुळे सरकारचे त्यांच्यावर नियंत्रण नाही, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

