उल्हासनगरात शेकडो तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

उल्हासनगरात शेकडो तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

Published on

उल्हासनगर, ता. १३ (बातमीदार) : शेकडो तरुणांसोबत मुस्लिम तरुणींनीही ठाकरे गटात प्रवेश करून उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, महानगरप्रमुख राधाचरन करोतिया, शहरप्रमुख कुलविंदर सिंह (बिंदर) बैंस यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणुका सोसायटी शिवसेना शाखेत सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या शेकडोंच्या संख्येने तरुणांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सामाजिक कार्य करताना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घ्यावा. महागाईने जनता त्रस्त झाली असून, यावर लवकरच जनआंदोलन करण्यात येणार आहे, यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन बोडारे यांनी केले. या वेळी कल्याण जिल्हा संघटिका अंजली राऊत, माजी महापौर मालती करोतिया, उल्हासनगर संघटिका जया तेजी, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, शेखर यादव, कृष्णा पुजारी, भगवान मोहिते, राजू माने, विधानसभा प्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख आदिनाथ पालवे, अशोक जाधव, उपशहर संघटिका सुनीता गव्हाणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com