वाहतूक सेविकेला दुचाकीस्वाराची धडक

वाहतूक सेविकेला दुचाकीस्वाराची धडक

Published on

वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : शहरातील पूर्व भागात वाहतूक पोलिस निशा जाधव या कर्तव्यावर असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्या जखमी झाल्या. त्यांनी दुचाकीस्वाराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दुचाकीस्वाराने जखमी निशा जाधव यांना मदत करण्याऐवजी त्यांचा हात जोराने पिरगळला. भररस्त्यात मारहाण केल्याची ही घटना शुक्रवारी (ता. १०) घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात जाधव यांच्या तक्रारीवरून दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात प्रगती महाविद्यालयाजवळील रस्त्याचे काम सुरू आहे. येथे शुक्रवारी निशा जाधव वाहतूक नियोजनाचे काम करीत होत्या. या वेळी एका भरधाव दुचाकीस्वाराने जाधव यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्या जमिनीवर कोसळल्या. निशा यांनी दुचाकीस्वाराला दुचाकी व्यवस्थित चालविता येत नाही का, असा प्रश्न करताच दुचाकीस्वाराने निशा यांना उलट उत्तरे देत त्यांना मारहाण केली. दुचाकीच्या धडकेत निशा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. वाहतूकसेवक दिनकर सोमासे, महिला सेविका कानेरकर, साळवे यांनी जखमी निशा जाधव यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com