बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नवी मुंबई, ता. १३ ः नवी मुंबई सीवूड्स येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे सम्यक फाउंडेशन बौद्धजन पंचायत समिती शाखेकडून रमाई महिला मंडळ व सम्यक युवा मंच यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव सतत तीन दिवस सम्यक फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्याची सुरुवात शनिवारी (ता. १२)पासून झाली. या वेळी मनोवैज्ञानिक डॉ. शिल्पा परहार यांनी ‘बदलत्या हार्मोन्समुळे मानसिक व शारीरिक होणाऱ्या बदलांना कशाप्रकारे सामोरे जाता येईल’ या विषयावर अतिशय सखोल मार्गदर्शन केले. तर रविवारी (ता. १३) सांयकाळी सहा वाजता जाहीर सभा पार पडली. या वेळी सभेला ॲड. मकरंद अडकर व डॉ. वसंत म्हस्के हे भारतीय नागरिकांची सनद अर्थात भारतीय संविधान याच्यावर होत असलेले हल्ले व आपली जबाबदारी याविषयी माहिती देण्यात आली. तर सोमवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
....................
नेरूळमध्ये बाबासाहेबांचा थ्रीडी बॅनर
नवी मुंबई, ता. १३ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमरत्न युवा संघ यांच्या वतीने नेरूळ येथे भव्य असे बाबासाहेबांच्या थ्रीडी बॅनरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भीमगीतांवर नृत्य करण्यात आले. नेरूळ येथील सर्व भीम अनुयायांनी या वेळी सहभाग घेतला होता. भीमरत्न युवा संघाचे अध्यक्ष रविभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष संकेतभाऊ केदारे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कामगार नेते रवींद्र सावंत, आरपीआय नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, श्रीकांत जाधव व इतर स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

