गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
नौपाड्यातील घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः पाचपाखाडी भागात एका जांभळाच्या झाडाला महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टता झालेली नाही. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पार्वती शर्मा (वय ३८) असे या मृत महिलेचे नाव आहे. मूळची नेपाळची असलेली पार्वती तिच्या पतीसह अल्मेडा रोड परिसरातील एका गृहसंकुलात राहत होती. त्याच ठिकाणी तिचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात, तर तिची दोन मुले नेपाळ येथे राहतात. रविवारी दुपारी या परिसरातील एका गृहसंकुलाच्या आवारात जांभळाच्या झाडाला पार्वती शर्मा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिस आणि पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिचा मृतदेह खाली उतरवून तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

