यशोधननगरमध्ये गॅसपुरवठा बंद
यशोधननगरमध्ये गॅसपुरवठा बंद
ठाणे, ता. १३ ः कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गॅसपुरवठा बंद झाल्यामुळे ठाण्यातील यशोधननगरची चूल दुपारी पेटलीच नसल्याचे उघडकीस आले आहे. ऐन दुपारी तब्बल चार तास गॅसपुरवठा बंद राहिल्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुपारच्या जेवणासाठी हॉटेल, पार्सलचा आधार घ्यावा लागला.
वागळे इस्टेट येथील यशोधननगर परिसरातील बहुतांश इमारतींचा दुपारी १२च्या सुमारास महानगरचा गॅसपुरवठा अचानक बंद पडला. त्याचा या भागातील २००हून अधिक रहिवांना फटका बसला. रविवारचा बेत उरकत असतानाच गॅसपुरवठा बंद झाल्यामुळे शेगडीवर चढवलेले जेवण कच्चेच राहिले. त्यामुळे पुढचा स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न गृहणींसमोर उभा राहिला. बाहेरच्या जेवणावर दुपारची वेळ भागवण्यात आली. दरम्यान, काही रहिवाशांनी महानगर गॅसच्या कार्यालयात संपर्क साधला असता पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले; पण सायंकाळपर्यंत गॅसपुरवठा बंद होता, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

