डॉ. बाबासाहेबांच्या वैचारांचा जागर

डॉ. बाबासाहेबांच्या वैचारांचा जागर

Published on

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेरूळ, बेलापूर, तुर्भे हनुमान नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान नगर येथे परिवर्तन सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रारभी सकाळी बुद्ध वंदना आणि निळा ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ आहेत हे जगाने मान्य केले आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता भारतीय जनतेला समता, स्वातंत्र्याचा संदेश देत त्यांनी देशाला संविधान दिले, असे राजेंद्र बनसोडे यांनी सांगितले. या प्रसंगी संजय जवादे, शशिकांत वंजारे, शिवशंकर बनसोडे, कुणाल बनसोडे, ऋषिकेश सरवदे, शिवा वाघमारे, योगेश वाघमारे, सुरेश हाताळे आदी मान्यवर उपस्थित होते. नाका कामगार सेनेच्या वतीनेही जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेना कामगार सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष प्रदीप बी. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे तुर्भे उपविभागप्रमुख विजय गायकवाड, कामगार सेनेचे महेबूब शेख, तुर्भे नाका कामगार अध्यक्ष भारत प्रधान, सचिव मोरे, साईनाथ रायबोले, शेषराव क्षीरसागर, मारुती कालापाड, संतोष नवघरे, गोतू कुरे, अरुण जाव, सोहेल शेख, कैलास कांबळे, विनोद भिडे, विनोद कालापाड, राजू कसबे, गणेश धनगर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नेरूळ येथील कपिलवस्तू बुद्ध विहार, बेलापूर आयकर कॉलनी येथील धम्मदीप सामाजिक संस्थेच्या वतीने सुभाष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com