श्रमजीवीच्या आंदोलनाचा धसका
वज्रेश्वरी, ता.१४ (बातमीदार)ः उसगाव येथील एका तेरा वर्षीय मुलाच्या शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका दिली गेली नाही. यामुळे मृतदेहाची अवहेलना झाल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर हातगाडी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने रुग्णवाहिकाची सुविधा दिली आहे. त्यामुळे गरीब, गरजूंना दिलासा मिळाला आहे.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या उसगाव येथे खोदलेल्या टेकडीचा मातीचा ढिगारा कोसळल्याने हर्षद मेढा या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खासगी गाडीचा वापर करावा लागला होता. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाबाबत जनरोष निर्माण झाला होता. तर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील उदासिनतेविरोधात हातगाडी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण आंदोलनापूर्वीच प्रशासनाने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

