मुरबाडमधील वाहतूक कोंडी सुटणार

मुरबाडमधील वाहतूक कोंडी सुटणार

Published on

मुरबाड, ता. १५ (बातमीदार)ः कल्याण-मुरबाड माळशेज घाट रस्त्यावरील उड्डाणपुलावरील काँक्रीटचे गर्डर बसवण्यात आले आहेत. मुरबाड एसटी बसस्थानकासमोर उभारण्यात येणारा हा पहिलाच उड्डाणपूल असून, माळशेज घाट, कल्याण मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
मुरबाड शहरातील सोनार पाडा भागातून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे, तर त्याचे शेवटचे टोक सारिका हॉटेलजवळील पेट्रोलपंपापर्यंत आहे. या उड्डाणपुलामुळे मुरबाड शहराची गाव आणि औद्योगिक वसाहत परिसराची विभागणी झाली आहे. या पुलामुळे मुरबाड बसस्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, माळशेज घाट तसेच कल्याणकडे जाणारी वाहने पुलावरून जाणार आहेत.
--------------------------------------------
दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम
मुरबाड बसस्थानकाजवळील तीनहात नाका परिसरात विविध फळभाज्या, पालेभाज्या, रताळी, चवळीच्या शेंगा, मिरची खरेदीसाठी येणारी वाहने आता उड्डाणपुलावरून जाणार आहेत. त्याचबरोबर उड्डाणपुलामुळे छोट्या दुकानदारांवरही परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com