श्रीवर्धन आगारात पाच बस दाखल
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) ः श्रीवर्धन आगारासाठी पाच नवीन बस देण्यात आल्या असून, सोमवारी (ता. १४) सायंकाळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा, यासाठी अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. या प्रयत्नांना यश आले असून श्रीवर्धन आगारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण पाच बस देण्यात आल्या आहेत. या वेळी श्रीवर्धन बसस्थानक इमारतीच्या होत असलेल्या नूतनीकरणाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. या वेळी श्रीवर्धन आगार वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, श्रीवर्धन आगार कर्मचारी वृंद, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर तसेच महिला तालुका अध्यक्षा सबा फिरफिरे, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, गणेश पोलेकर, हरिदास वाघे आदी उपस्थित होते.
श्रीवर्धन-मिरज या मार्गावर नवीन बस सोडण्यात येणार आहे. काही दिवसांतच तुळजापूर, शिर्डी, हरिहरेश्वर अक्कलकोट, नालासोपारा या मार्गावर बी एस सहा बस सोडण्यात येणार असून, लवकरच वेळापत्रक व मार्ग जाहीर करण्यात येईल. आगारात आणखी पाच बस उपलब्ध झाल्यावर इतर फेऱ्या वाढवण्याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे.
- महिबूब मणेर, आगारप्रमुख, श्रीवर्धन
बंद बससेवा सुरू करण्याची मागणी
श्रीवर्धन आगाराकडून कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली अलिबाग व दापोली बस तसेच पुणे, भाईंदर या बससेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी या वेळी प्रवासीवर्गाकडून आदिती तटकरे यांच्याकडे करण्यात आली, मात्र या वेळी तोट्यातील बस सुरू होणार नाहीत, असा खुलासा रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केला.
बी एस सहाच्या दहा गाड्या!
बी एस सहा बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट केल्या असून, प्रदूषण नियंत्रणासाठी मानांकनानुसार तयार केल्या आहेत. या बसमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. श्रीवर्धन आगारात बी एस सहाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून, काही कालावधीत आणखी पाच नव्या बी एस ६ गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी येत आहेत. प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र चार्जिंग पॉइंट, पुश बॅक व आरामदायक सीट, रिव्हर्स कॅमेरा, युएसबी यंत्रणा, सूचना देण्यासाठी माईक आणि साउंड सिस्टीम सुविधा अशा यंत्रणांनी सुसज्ज अशा बसचे लोकार्पण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

