काळूराम धोदडे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार
विरार, ता. १५ (बातमीदार) : स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र विनायक उर्फ रा. वि. भुस्कुटे स्मृती जीवन गौरव पुरस्कार मरणोत्तर काळूराम धोदडे आणि युवा पुरस्कार सुनील मलावकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (ता. १६) पालघर पूर्वेतील नवली येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या कै. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृहात होणार आहे, असे स्वातंत्र्यसैनिक रा. वि. भुस्कुटे जीवनगौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष पराग ओक यांनी म्हटले आहे. भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम धोदडे उर्फ काका यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आदिवासी, भूमिपूत्र, मच्छीमारांसह शेतकरी यांच्या घटनात्मक न्याय हक्कांसाठी संघर्षरत राहिले. कष्टकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते, डहाणूतील आंबेसरीता येथील सुनील किकू मलावकर यांनी शिक्षण, वन हक्क, जमीन हक्क, आरोग्य हक्क आणि महिला हक्कांविषयी घटनात्मक मार्गाने संघर्षरत राहून काम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

