दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हिर्शस्प्रंग आजारावर उपचार

दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हिर्शस्प्रंग आजारावर उपचार

Published on

दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हिर्शस्प्रंग आजारावर उपचार
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १५ : जन्मापासून नैसर्गिकरित्या मलविसर्जन करू न शकणाऱ्या दोन वर्षांच्या बाळावर एका खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. हिर्शस्प्रंग या दुर्मिळ जन्मजात विकारामुळे बाळाला रोज एनीमावर अवलंबून राहावे लागत होते.
या आजारात मोठ्या आतड्याच्या काही भागांमध्ये मज्जातंतू पेशी विकसित होत नाहीत, त्यामुळे मल साचून राहतो व पोट दुखते, फुगते. बाळाच्या नाशिकस्थित पालकांनी अनेक उपचार करूनही फरक न पडल्याने मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीत हिर्शस्प्रंगचे निदान झाले आणि पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटॉमी (प्रेम) नावाची दुर्मिळ प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया शरीरावर कोणतीही जखम न करता एंडोस्कोपिक पद्धतीने गुदद्वारातून केली गेली. तीन तास चाललेल्या या उपचारांनंतर बाळाच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. आता त्याला कोणत्याही वैद्यकीय सहाय्याची गरज नाही. उपचारानंतर केवळ दोन दिवसांत त्याला घरी सोडण्यात आले आणि तो आता पूर्णपणे सामान्य आयुष्य जगतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com