स्पायना बिफिडा विरोधात जनजागृती

स्पायना बिफिडा विरोधात जनजागृती

Published on

स्पायना बिफिडा विरोधात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १५ : स्पायना बिफिडा या जन्मजात न्यूरल ट्युब दोषाबाबत जनजागृती करण्यासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व स्पायना बिफिडा फाउंडेशनने संयुक्तपणे मोफत तपासणी व समुपदेशन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात बालकांसाठी उंची, वजन, हाडांची घनता (बीएमडी), शरीर रचना विश्लेषण, एच. बी. ए १ सी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ व आहारतज्ज्ञांच्या वैयक्तिक सल्ल्यानंतर समुपदेशन सत्र घेतले गेले.
हे शिबिर अभिनेत्री रवीना टंडन यांच्या उपस्थितीत पार पडले. शिबिराचे नेतृत्व करणारे बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संतोष करमरकर यांनी सांगितले की, भारतात दर एक हजार जन्मांपैकी सुमारे चार ते पाच बाळांमध्ये स्पायना बिफिडा आढळतो, मात्र याविषयी जागरूकतेअभावी अंदाजे ७० टक्‍के रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. फाउंडेशनने २०१५ पासून जागरूकतेसाठी देशभर मोहिम राबवली असून, सध्या दिब्रुगड, कोलकाता, हैदराबाद व दिल्लीमध्ये समन्वयक नियुक्त केले आहेत. लीलावती रुग्णालयाचे डॉ. निरज उत्तमणी यांनी सांगितले की, प्रत्येक मुलाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा आमचा उद्देश आहे. अशा उपक्रमांतून केवळ उपचार नव्हे, तर समाजातील समज, सहकार्य आणि सकस जीवनाचा अधिकारही मजबूत केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com