बागेश्वर मठाचे भिवंडीत लोकार्पण
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर)ः श्री बागेश्वर मठाचे अधिपती पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील भिवंडी येथील पहिल्या बागेश्वर बालाजी सनातन मठाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी हे केंद्र आस्थेचे श्रद्धास्थान बनणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गोरगरीब बागेश्वर बालाजी भक्तांना मध्य प्रदेशात जाणे शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम पर्वणी आहे. हा मठ सनातन धर्म प्रसाराचे केंद्र, भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान बनणार आहे. साडेचार एकर क्षेत्रफळावरील मंदिराची रचना ही तळ अधिक एकमजली असून, मंदिराच्या पाठीमागच्या ठिकाणी यज्ञ शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर श्री बागेश्वर बालाजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, बालाजींच्या उजव्या बाजूला गणरायाची मूर्ती तर डाव्या बाजूला शिवलिंग, तर बालाजींच्या मूर्तीच्या समोरच अगदी वरच्या भागावर प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तळमजल्यावर दिव्य दरबारासाठी सभागृहात रामायणातील विविध प्रसंगांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. मंदिर लोकार्पणानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार मनोज तिवारी, माजी खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली.
-------------------------------------------------------------------
भारतामध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. जे कोणी स्वतःला हिंदुस्थानी मान्य करीत नाहीत, ते देशाचे दुर्भाग्य आहे. अनेक ठिकाणांहून हिंदूंचे पलायन होत आहे. भयप्रद वातावरणामुळे पश्चिम बंगालमध्ये अशीच परिस्थिती होती. उद्या महाराष्ट्र, पुढे मध्य प्रदेशमध्येदेखील असेच प्रकार होतील. विशिष्ट समुदायाकडून हिंदूंना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे निंदनीय आहे.
- धीरेंद्र शास्त्री, महाराज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

