थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदविका विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील खांब येथील सेवानिवृत्त इंजिनिअर सूर्यकांत विरकर यांच्या पुढाकाराने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदविका विद्यार्थ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा हरिहरेश्वर येथील माजी विद्यार्थी ओमप्रकाश कोलथकर यांच्या होम स्टे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महाड येथील शासकीय तांत्रिक संस्थेतील १९१८१-८४ बॅचच्या माजी विद्यार्थी वर्गाच्या सलग तिसऱ्या कौटुंबिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान वसंत शेठ यांनी भूषविले. या मेळाव्यात एकूण ३० माजी विद्यार्थी सहकुटुंब सहभागी झाले होते. उपस्थितांनी संगीत, भजन, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून मेळाव्याचे वातावरण अधिक मनोरंजक केले. अध्यक्षस्थान भूषविलेल्या वसंत शेठ यांनी आपल्या सर्व माजी विद्यार्थीवर्गाला कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील मार्गदर्शन केले. या वेळी वसंत शेठ यांचा सर्व विद्यार्थ्यांनी सन्मान केला. स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूर्यकांत विरकर यांनी केले. शिरीष पाटील यांनी आभार व्यक्त करून स्नेहमेळाव्याची यशस्वीरीत्या सांगता केली.
................
मोरगिरी फौजदार वाडी येथे भव्य आरोग्य शिबिर उत्‍साहात
पोलादपूर (बातमीदार) ः तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या मोरगिरी फौजदारवाडी या दुर्गम गावात ग्रामविकास समिती फौजदारवाडी, ग्रुप ग्रामपंचायत मोरगिरी, स्वदेस फाउंडेशन व वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मंदिर प्रांगणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन ग्रामविकास समिती अध्यक्ष संजय शिंदे, सरपंच जगन्नाथ वाडकर, युवा उपसरपंच प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश शिंदे, मधुकर जाधव, भारती शिंदे, माधुरी दळवी, हर्षदा शिंदे, उपसरपंच सविता शिंदे, बाळकृष्ण शिंदे, अंगणवाडीसेविका शिल्पा शिंदे, अशासेविका स्वाती दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, महिलांच्या आजारांबाबत सल्ला व तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, हाडांचे विकार, बीपी व शुगर तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. १०० ते १२० ग्रामस्थांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com