गवळी समाज बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
गवळी समाजबांधवांचा शिवसेनेत प्रवेश
माणगावा, ता. १५ (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यात पुरार गावामधील गवळी समाजाने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेक्ष केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादी पक्षाला गवळी समाजाचा ठाम पाठिंबा मिळाला होता. अनेक राजकीय घडामोडी घडूनदेखील पुरार येथील गवळी समाज हा एक निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम उभा होता, मात्र गेली अनेक महिने विकासकामे रखडली असल्याने अखेर कंटाळून बहुसंख्य गवळी समाजबांधवांनी मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. १३ एप्रिल रोजी पुरार येथील यादव सहाय्य्क समिती गोवेले विभागाच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनाचे औचित्य साधत पुरार गौळवाडी येथे माजी पोलिस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे व दीडशे पेक्षा जास्त गवळी समाजबांधवांनी शैलेश साबळे यांच्या नेतृत्वावर तसेच उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा हाती घेतला, तर रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार गोगावले यांच्या माध्यमातून सर्व विकासकामे आता पूर्णत्वास लागतील, असा ठाम विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. पक्षप्रवेश कार्यकर्माच्या वेळी भरत गोगावले यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, प्रकाश गोरिवले, सुरेश उंडरे, अनेक गवळी समाजबांधव महिलावर्ग व तरुण मंडळी हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

