

मुलुंडमधील पादचारी पुलाचे काम रखडले
पूर्व-पश्चिम ये-जा करताना प्रवाशांची गैरसोय
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वे आणि पश्चिमेकडील भागांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
रेल्वेस्थानकाच्या आतून विनातिकीट एकमेव पर्याय असलेला हा पूल बंद असल्यामुळे पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे ॲड. सागर देवरे यांनी सांगितले.
२०२३ मध्ये मध्य रेल्वेने या पुलाची सहा महिन्यांची दुरुस्ती आणि सुधारणा करून तो नागरिकांसाठी खुला केला होता. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने नव्या पुलाचे आश्वासन दिले होते. नवीन पूल विद्यमान पुलापासून सुमारे सात मीटर अंतरावर उभारण्यात येणार असून, नवीन पूल सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाची तोडफोड केली जाईल, असे सांगण्यात आले होते.
मुलुंड येथे एमआरवीसीतर्फे एकूण चार पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मुलुंड पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे, मात्र एकूण परिस्थिती पाहता एकूण चार पूल उभारण्यात येणार असल्यामुळे पूल बांधून पूर्ण व्हायला वेळ लागेल असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ४० कॉलम पैकी २४ कॉलम उभारून पूर्ण झाले आहेत. बाकी सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या केवळ पाया आणि गर्डरचे काम पूर्ण झाले असून, बाकी काम अद्याप रखडले आहे. जुन्या पुलाचेच योग्य रीतीने नूतनीकरण केले असते, तर अशी अडचण निर्माण झाली नसती, असा आरोप मुलुंडकरांनी केला आहे.
टीसीकडून कारवाई
मुलुंड पूर्व पश्चिम पुलाचे काम सध्या सुरू आहे, मात्र आम्हाला पूर्वेकडून मुलुंड पश्चिमेला जायचे असल्यास रेल्वेच्या पुलाचा वापर करावा लागतो. अनेकवेळा टीसी आम्हाला दंड भरायला सांगतात. याच कारणास्तव या पुलाचे बांधकाम लवकर करावे, अशी आमची रेल्वे प्रशासनाकडे मागणी आहे, असे स्थानिक रहिवासी संजय दाते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.